आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोप:राष्ट्रीय आपत्तीत भाजप राजकीय संधीच्या शोधात - महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांचा गंभीर आरोप

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • थोरात यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला

वांद्र्याचा प्रकार घडल्यानंतर भाजपचे नेते अचानक सक्रिय झाले. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी राज्य सरकारवर अपयशाचे खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. ही तत्परता त्यांनी सुरत, हैदराबाद आणि दिल्लीत झालेल्या अशा घटनांवेळी का दाखवली नाही, असा सवाल करत राष्ट्रीय आपत्तीत भाजपची मंडळी राजकारणात दंग आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. 

थोरात यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी थोरात म्हणाले की, रेल्वेच्या गलथान कारभारामुळे वांद्रे येथे परप्रांतीय मजुरांची गर्दी जमा झाली होती. परंतु त्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी या संधीचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, लष्कर बोलवावे इथपर्यंत मागण्या केल्या. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा हॅशटॅग चालवण्यात आला, असे थोरात यांनी सांगितले. अशा राष्ट्रीय आपत्तीतही राजकारण करण्याची संधी विरोधकांनी शोधली हे दुर्दैवी आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...