आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ असून मी सामना वाचत नाही आणि सामनाची दखल देखील मी घेत नाही, असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. विधानपरिषद निवडणूकांमध्ये पंकजा मुंडेंना डावलण्यात आले असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला होता.
पुढे ते म्हणाले की, भाजपा हे पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. पंकजा मुंडे या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासहा भाजपाच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. बाकी कोणी त्यांची काळजी करण्याची गरज नाही.
विठ्ठलापेक्षा नरेंद्र मोदींचा फोटो मोठा असलेल्या बॅनरवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, संबंधित बॅनर हे पक्षाकडून लावण्यात आलेले नाहीत. कुठेतरी कार्यकर्ता उत्साहाने लावतो. एवढे मॉनिटर का केले जाते, माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनर लावावे. त्यात विठ्ठलाचा फोटो मोठा लावावा आणि मोदींचा फोटो लहान लावावा किंवा लावू नये.
सुप्रिया सुळे यांच्यावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, नाचता येईना आंगन वाकडे, त्यांना पराभव आधी दिसला होता. त्यामुळे त्याची स्क्रिप्ट आधीच करण्यात आली होती. त्यानंतर सगळे त्या स्क्रिप्टनुसार बोलतात. त्यांच चांगल आहे की आपआपसात भांडण जरी असली तरी दिवसभर सगळे एकच वाक्य बोलत असतात.
काय म्हणाले राऊत?
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली. तसेच, गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे जवळचे संबंध होते. त्यामुळे पंकजा मुंडेंची आम्हाला चिंता वाटते, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.