आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हो-हो पण नाही:राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार, पण भाजपने हात पुढे केला असा अर्थ काढू नका -चंद्रकांत पाटील

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेने मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेतला, निवडणुकीनंतर पळ काढला -भाजप

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सरकार आणि युतीबद्दल पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत येण्यास तयार आहोत असे पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्रित येण्यास तयार आहोत. पण, जर निवडणूक होत असेल तर त्या एकत्रित लढणार नाही. सोबतच, भाजपने सत्ता स्थापनेसाठी हात पुढे केला असाही अर्थ काढू नका. ते मराठी वाहिनी टीव्ही 9 शी संवाद साधताना बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी याचवेळी भविष्यातील शक्यता आहेत असेही पाटील यांनी सांगितले आहे.

भाजप स्वबळावर लढवणार निवडणूक

उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्रातील नवनियुक्त भाजप कार्यकारिणीची सोमवारीच बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना भाजप आता राज्यात स्वबळावरच निवडणूक लढवणार आणि त्यासाठी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीने तयारी करावी असे त्यांनी म्हटले आहे.

भविष्यात राजकीय शक्यता आहेत - पाटील

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वबळाची हाक दिली तरीही भविष्यातील राजकीय शक्यता आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. "जर-तर अशी हवेतली चर्चा सुरु आहे. केंद्रीय नेतृत्वाची जर चर्चा झाली, तर जसे बिहारमध्ये नितीश कुमारांनी वर्षभरात लालूंची साथ सोडली, तसे शिवसेनेला वाटले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून, त्याबाबत चर्चा होऊ शकते. पण या जर-तरच्या गोष्टी आहेत."

शिवसेनेने मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेतला, निवडणुकीनंतर पळ काढला

"आम्ही आज विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. शिवसेनेने एकत्र निवडणुका लढवून, मोदींच्या प्रतिमेचा फायदा घेतला. जर एकत्र यायची वेळ आली, तरी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढणार नाही. निवडणुका झाल्यानंतर दोघांची मेजॉरिटी झाली नाही, तर एकत्र येऊ शकतात. शिवसेनेने निवडणुका एकत्र लढवून पळ काढला." असे आरोप भाजप प्रदेशाध्यक्षांनी केले आहेत.