आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • BJP Is Taking Action By Threatening, If Voters Are Being Threatened To Vote Then Is There Democracy In The Country? Question From Aditya Thackeray

भाजपची दबावशाही:भाजप धमक्या देऊन कारवाया करतंय, मतदारांना धमक्या दिल्या जात असतील तर देशात लोकशाही आहे का? - आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदान करा म्हणून जर मतदारांना धमक्या दिल्या जात असतील तर देशात लोकशाही आहे का? भाजप धमक्या देऊन कारवायाही करीत आहे, भाजपची दबावशाही सुरू आहे. हे देशासाठी धोक्याचे आहे अशी टीका पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज केली.

इडीने आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करून 11 कोटींवर संपत्ती जप्त केली. संजय राऊतांवर टाच आल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. त्या धर्तीवर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनीही सवाल केले. ते म्हणाले, भाजप राजकीय हेतूने इडीमार्फत कारवाया करीत आहे. सध्या देशात जे चालले ते लोकशाहीचे वातावरण नाही असेही ते म्हणाले.

काल-परवा कोल्हापूरच्या पोटनिवडणुकात मतदारांना संबोधन करताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पैसे घेऊ नका अन्यथा ईडीची चौकशी लावेल असे वक्तव्य केले होते. यानंतर या वक्तव्यावर बरीच टीका झाली. त्यासंबंधी आदित्य ठाकरे यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, मतदारांना धमक्या दिल्या जात असेल तर देशात लोकशाही आहे का हा प्रश्न आहे. मतदानासाठी अशा धमक्या येत असतील तर देशात लोकशाही नाही असे वाटते. लोकशाहीत टीका करणे योग्य पण धमक्या देणे योग्य नाही असेही ते म्हणाले.

भाजप धमकावून कारवाया करतंय

भाजप धमक्या देऊन महाराष्ट्रात ईडीच्या कारवाया करीत आहे. हे धोक्याचे आहे, देशात लोकशाही राहीली की नाही यावर विचार करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणासंबंधी त्यांनी संपलेल्या विषयावर जास्त बोलायचे नसते असे म्हणत जास्त बोलण्याचे टाळले.

बातम्या आणखी आहेत...