आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेवर टीका:'हा म्हणजे शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग...' लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जव्ह जिहादवर भाष्य केले होते.

लव्ह जिहाद प्रकरणावरुन देशभरात सध्या राजकारण सुरू असल्याचे दिसते. यासोबतच महाराष्ट्रातही या मुद्द्यवरुन बरेच राजकारण सुरू आहे. यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने लव्ह जिहादवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सामना अग्रलेखांचा उल्लेख करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग, असे म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल जव्ह जिहादवर भाष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, 'लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा आहे. अखेर लग्न करत असताना मुलगा आणि मुलीची संमती महत्त्वाची असते. मात्र, भाजप यावरुन फक्तर राजकारण करत आहे,' अशी टीका त्यांनी केली होती. यावरुन किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

किरीट सोमस्यांनी स्वतःचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. '"शिवसेना चा बदलता रंग". 10 सप्टेंबर 2014 चा अंकात "सामना" वर्तमानपत्र संपादक श्री उध्दव ठाकरे लिहितात "लव्ह जिहाद" समाजासाठी घातक. योगी आदित्यनाथ ना पाठिंबा... 21 नोव्हेंबर 2020 शिवसेना, सामना, महापौर सांगतात "लव्ह जिहाद" मधे गैर काहीच नाही' असे त्यांनी व्हिडिओच्या वर लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...