आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडनाव पाहून मुंबई पालिकेची घरांवर कारवाई:भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप, म्हणाले - तुम्हाला खान, पठाण, शेख दिसत नाही का?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात मुंबई महापालिकेच्या पथकाला अनधिकृत बांधकाम आढळले आहे. त्यावरून मुंबई महापालिकेतर्फे राणा दाम्पत्याला आजच कारवाईची नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेला कारवाईसाठी केवळ राणा, राणे, राणावत, कंबोजच दिसतात का? पालिकेला खान, पठाण, शेख यांच्या घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसत नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच, मुंबई पालिका आडनाव पाहून कारवाई करत आहे. शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असा आरोपही शेलार यांनी केला.

राष्ट्रीय तपास संस्था एएनआयने काल मुंबईत धाडी टाकून दाऊदच्या हस्तकांवर कारवाई केली. मात्र, राज्यातील पोलिस हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर कारवाई करत आहे. हाच दोन्ही सरकारमधील फरक आहे. राष्ट्रवादी, हिंदुवादी आणि ढोंगी राज्य सरकारमधील हा फरक असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली.

आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही!
आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. मात्र, दिल्लीतील शाहीनबाग, जहांगिरपुरीतील अतिक्रमणांवर ज्याप्रमाणे कारवाई होती, तशीच कारवाई मुंबईतील नागपाडा, बेहरामपाडा, मोहम्मद अली रोड येथे का होत नाही? गेल्या 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. एकदाही या भागात अतिक्रमणविरोधी कारवाई झालेली नाही. या अतिक्रमणांकडे सरकार का दुर्लक्ष करते, असा सवालही आशिष शेलार यांनी केला. तसेच, शाहीनबागमध्ये कारवाई होते. तेव्हा मात्र हे सरकार कोल्हेकुई करते, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...