आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा नवा आरोप:परमबीर सिंह गायब झाले त्यासाठी ठाकरे सरकारच जबाबदार, परदेशात आश्रय मिळवून देण्यासाठीही मदत; भाजप नेते आशिष शेलारांचा आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात क्रूझ ड्रग्स प्रकरणापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. राज्यातील राजकीय वातावरण हे तापलेले दिसत आहेत. दरम्यान अनिल देशमुखांना रात्री उशीरा ईडीने अटक केली आहे. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी खळबळजनक आरोप केला आहे. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंहांना ठाकरे सरकारनेच गायब केले असल्याचे ते म्हणाले आहेत. टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे भाष्य केले आहे.

पुढे बोलताना शेलार म्हणाले की, 'परमबीर सिंह फरार होण्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंह पळून गेले असले तरी त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना असेही शेलार म्हणाले. तसेच महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्या देशात जातील तिथे त्यांना आश्रय मिळावा याचा प्रयत्नही राज्य सरकार करत आहेत. परमबीर सिंह यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती असल्यामुळे सरकार पळायला मदत करत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे.

दरम्यान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. यानंतर त्यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून देशमुख हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान परमबीर सिंह देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणामध्ये मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्येही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या अटकेच्या भीतीपोटीच परमबीर सिंह हे देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...