आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सव:ठाकरे सरकार सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात बोटचेपं धोरण का घेत आहे? असे म्हणत आशिष शेलारांचं सर्व गणेशोत्सव मंडळांना 'हे' आवाहन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना सुरू होताच देशात सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. लवकरच गणेशोत्सव येत आहे. या बद्दल राज्य सरकारने काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत. यानंतर आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका करत सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन केलं आहे.

'सर्व गणेशोत्सव मंडळांना आवाहन! कृपया सर्व गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीही मंडपाची परवानगी पालिकेकडून घ्या...गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायची की नाही, हा निर्णय तुमचा.. पण परवानगी घ्या...न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे.' असे ट्विट त्यांनी केले आहे. यासोबतच ठाकरे सरकार सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बोटचेपं धोरण का घेत आहे हे मला माहिती माहीत नाही असंही ते म्हणाले आहेत.

तुम्हाला पुढच्यावर्षी गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर यंदा गणेश मंडपाची परवानगी घ्या. करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा नाही केला तरी चालेल. तो तुमच्या मंडळाचा निर्णय असेल. मात्र मंडपाची परवानगी घ्या, नाही तर पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात, असं आवाहन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विरवर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी हे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक वर्षी गणेशोत्सव मंडळे मुंबई महापालिकेकडे मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज करत असतात. दरवर्षी 12 हजारांपेक्षाही जास्त अर्ज येत असतात. मात्र यंदा करोनाचं संकट आहे. त्यामुळे केवळ 600 ते 650 च अर्ज आलेले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. न्यायालयीन लढ्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या भविष्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे, असं शेलार म्हणाले आहेत.

गणेशोत्सवाबाबत ठाकरे सरकार बोटचेपं धोरण का घेत आहे? हे कळायला मार्ग नसल्याचेही ते म्हणाले. तसेच गणेशोत्सवासाठी करावा लागलेला न्यायालयीन संघर्ष ठाकरे सरकार आणि सरकारमधील पक्षांना माहीत नाही. त्याचं त्यांना ज्ञानही नाही अशी टीका त्यांनी केली आहे. त्यामुळे मंडपासाठी परवानगी घेणं गरजेचं आहे असं शेलार म्हणाले.

यासोबतच पुढे शेलार म्हणाले की, पालिका प्रशासनाने गेल्या वर्षीच्या आकडेवारीचा आधार घेऊन सरसकट सर्व मंडळांना मंडपाची परवानगी द्यावी, तसं पत्रक काढावं किंवा जीआर काढावा अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.