आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सव:कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? की कोकणी माणसाची बाप्पांशी ताटातूट करणार? शेलारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिना सुरू झाला आहे. अनेक सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. लवकरच गणपती उत्सव येत आहे. गपणतीसाठी कोकणात लाखो चाकरमानी जात असतात. आता त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासियांची ही राज्य सरकार ताटातूट करणार का? असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलारांनी पत्राच्या माध्यमातू विचारला आहे. तसेच लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या असेही म्हटले आहे. 

'गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी गावाकडे जाण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून रेल्वे गाड्यांची मागणी केलेली नाही. ई-पास व इतर वाहतूक सुविधांचा पत्ता नाही. सरकार कधी निर्णय घोषित करणार? ई-पास कधी पासून उपलब्ध होणार? कोरंटाईन करणार कि अँटीबॉडी टेस्ट करणार? असे अनेक सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केले आहे. 

कोकणातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपलब्ध साधने व निधी याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार असताना अन्न, गरम पाणी, शौचालये व औषधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नाही. सरकारने त्याबाबत साधा विचारही केलेला नाही.  किंवा बैठकही घेण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्यात दरी निर्माण झाली आहे. याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. असा आरोप शेलार यांनी केला आहे.