आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:याकूब मेमनच्या घरावर कारवाई नाही, मात्र कंगनाला नोटीस दिल्यावर अवघ्या 24 तासात झालेली कारवाई सूडबुद्धीची, आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कसाबला "बिर्याणी" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची "बिर्याणी" खाताय ना? बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, शेलारांचा शिवसेनेला इशारा

कंगनाच्या मुंबई विरोधी व्यक्तव्याचे भाजपकडून समर्थन केले जाणार नाही, मात्र कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेकडून केली गेलेली ही कारवाई म्हणजे सुड भावनेतून केलेली कारवाई असल्याचे’ भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. सोबतच कंगना आज मुंबईत दाखल होणार म्हणूनच तिचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी महापालिकेद्वारे अतिशय तत्परतेने ही कारवाई केली असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.कंगनाच्या ऑफिसवरील या कारवाईवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटर अनेक मुद्द्यांवर प्रश्नांचा भडिमार करत शेलार यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे.

कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला "बिर्याणी" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची "बिर्याणी" खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी”, असे शेलार म्हणाले.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. यावर बोलताना शेलार म्हणाले की, "भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्ड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? असे आशिष शेलार म्हणाले.

अभिनेत्री कंगणा राणावतने सांगितल्याप्रमाणे आज ती मुंबईत येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून कंगणाला पाठिंबा देणाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे ही सुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेईमानीच असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

शिवसेनेच्या अग्रलेखावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा!"