आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांत सामनातील अग्रलेखातून विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका करत आहेत. मात्र, आता धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या जावई प्रकरणात महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. ही वेळ साधत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावरून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मुंडे आणि मलिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की, जोरदार समर्थन करा आणि केंद्र सरकार कसं दोशी आहे हेही सांगा. लोक आतुरतेने वाट पाहत आहेत”, अशा शब्दात भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला.
मुंडे, मालिकांच्या प्रतापावर सामनामध्ये एखादा अग्रलेख पाडा की. जोरदार समर्थन करा आणि यात केंद्र सरकार कसे दोषी आहे हेही सांगा...लोक आतुरतेने वाट पाहतायत
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 14, 2021
हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात
यासोबत ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाचे नाव आल्यानंतर भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. “नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?”, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.
नबाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक. हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात. नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का?
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 13, 2021
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.