आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा:म्हणाले- सैरभैर झाल्यामुळे राऊतांकडून शिवराळ भाषेचा वापर; त्यांना आवरा, मुख्यमंत्र्यांना केली विनंती

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर जोरदार टीका करत आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, टीका करताना राऊत हे शिवराळ भाषेचा वापर करत आहे, यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राऊतांवर निशाणा साधत म्हणाले, संजय राऊत यांना आवरा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
आपण जे काही केले त्यामुळे आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कारवाई होईल अशी त्यांची स्थिती झाल्यामुळे राऊत हे सैरभैर झाले आहे. ते सातत्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या लाजवणारे शिवराळ शब्द वापरतात. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो आहे की, संजय राऊत यांना आवरा अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

किरीट सोमय्यांनी सवाल केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना अपशब्दांचा वापर केला. ते म्हणाले की, 'कोण आहे किरीट सोमय्या? देशात असे चु*## लोक फार आहेत. देशातील अशा प्रत्येक #** लोकांना शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणे मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण 2024 नंतर अशा *## लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशामध्ये राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असणार आहे. 10 मार्चनंतर तुम्हाला कळेल.' असे राऊत म्हणाले आहेत.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहेत. असे असताना भाजपच्या लोकांनी अपमान करणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा, मराठी लोकांचा अपमान आहे. यामुळे मी त्यांना *## म्हणालो आहे. अशा लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देते हादेखील अपमान आहे' असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...