आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेखातील भाषेबद्दल नाराजी:आपल्या 'सामना' वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता; चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैनिक ‘सामना’तील अग्रलेखाच्या भाषेवरून चंद्रकांत पाटलांचे संपादिका रश्मी ठाकरेंना पत्र

दैनिक ‘सामना’तील अग्रलेखाच्या भाषेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाराज आहेत. अग्रलेखातील भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी रश्मा ठाकरेंकडे याविषयी पत्राद्वारे तक्रार केली आहे. आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांनी पत्रात काय म्हटले?

गेल्या काही दिवसांपासून आपल्या सामना वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!

वहिनी आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण सामना वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या , त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल.

आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...