आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांना टॅग करून झुकेगा नही ट्विट:संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेला संपवणार नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाहीत, चित्रा वाघ यांची खोचक टीका

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात नेहमीच कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतो. ५ राज्‍यांच्‍या निवडणूकीत भाजपला कौल मिळत असून निकालाच्या पार्श्वभुमीवर चित्रा वाघ यांनी राऊतांवर खोचक टीका केली. जोपर्यंत सेना संपवणार नाही तो पर्यंत शांत बसणार नाही असा अप्रत्यक्ष टोला संजय राऊतांना त्यांनी लगावला.

आता हाती आलेल्‍या आकडेवारीनुसार काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. तर शिवसेनेच्‍या उमेदवारांना आपले डिपॉझिट सुद्धा वाचवता आले नाही. यावरून जो पर्यंत महाराष्‍ट्रात शिवसेनेचा सुपडा साफ करत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही असा उपरोधिक टोला राऊतांना लगावला आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून प्राथमिक फेऱ्यांमधून आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेसची मोठी पीछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजपनं उत्तर प्रदेशमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेश, गोवा, मणीपूर या राज्यांमध्ये उमेदवार उभे केले होते. मात्र, शिवसेनेला अपेक्षित मजल मारता आल्याचं या फेऱ्यांमध्ये दिसत नाही.

यामुळे राज्यात चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत. त्याचीच सुरुवात म्हणून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या निकालांवरून थेट संजय राऊत आणि शिवसेनेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

गोवा निवडणूकीवरून एकटे फडणवीस नेमके काय करू शकतात हे तुम्‍हाला समजलेच आहे. असे सांगतांना चित्रा वाघ यांनी ही तर केवळ सुरूवात आहे, महाराष्‍ट्रातील लढाई अजून बाकी आहे. असा इशाराच महाविकास आघाडीला दिला आहे. 5 राज्‍यातील निवडणूकानंतर महाराष्‍ट्रातील राजकीय वातावरण तापणार अशी चिन्‍ह आता दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...