आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:कांगावा नको, सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही, स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कांगावा नको, सरकार पाडण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं राऊत म्हणाले होते. यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, स्वतःच मारून घ्यायचं आणि स्वतःच रडायचं असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. तसेच ही पद्धत जर अवलंबली तर आपल्या अपयशापासून लोकांची नजर बाजूला होते. त्यातलाच हा प्रकार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'कुणीही सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. तरीही सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा कांगावा केला जात आहे. त्याऐवजी कोरोनाकडे लक्ष द्यायला हवं', असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला लगावला आहे. 

यासोबतच सध्या संजय राऊतांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत प्रसिद्ध केली जात आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित करण्यात आला. याविषयी प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, मुलाखत म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ किंवा नुरा कुस्ती आहे… मॅच फिक्सिंग आहे. अशी टीका त्यांनी केली आहे. यासोबतच संपूर्ण मुलाखत संपूद्या यानंतर मी यावर उत्तर देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...