आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप', देवेंद्र फडणवीसांची सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाने थैमान घातलेले आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारणही तापलेले दिसत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीवर विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका केली जात आहे. या तीन चाकी सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे बोलले जाते. आहा पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाबद्दल परिस्थिती मांडताना राज्य सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप' असल्याचं फडणवीस म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे एक कुटुंबाप्रमाणे असल्याचे आपल्याला दाखवले जात आहे. मात्र खरं तर हे कुटुंब नाहीच आहे. एकमेकांशी सुसंवाद नसलेलं हे सरकार म्हणजे कुटुंब नसून लिव्ह इन रिलेशनशिप असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आज केली आहे.

सरकार अंतर्विरोधानेच पडणार - फडणवीस

फडणवीस बोलताना म्हणाले की, मी इतिहासाचा अभ्यासक आहे. या प्रकारचं तीन चाकी सरकार यापूर्वी कधीही चालेलं नाही. या सरकारमध्ये काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस हे सरकार चालू देणार नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काहीही म्हणत असले तरीही काँग्रेसनेही असं सरकार कधीच चालू दिलेलं नाही. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं हे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे.

मुख्यमंत्री खूप सांभाळून निर्णय घेतात पण आता असे चालणार नाही - फडणवीस

फडणवीस बोलताना म्हणाले की, या सरकारमध्ये कुठलाही समन्वय दिसत नाही. मुख्यमंत्री प्रशासनावर अवलंबून असतात. यामध्ये काहीही चुकीचं नाही. मात्र आता प्रशासनाला नेतृत्वाला देण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीये. ते खूप सावधपणे, संभाळून पावले उचलतात. याच कारणामुळे निर्णय होत नाहीत. आता ते मुख्यमंत्री होऊन आठ-नऊ महिने झाले आहेत. त्यामुळे असे संभाळून निर्णय आता चालणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.