आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणावरुन राज्यात रणकंदन माजले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका न घेण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता. तर दुसरीकडे, ओबीसी आरक्षणावरुन विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत असून राज्यातील राज्य सरकारवर हल्लाबोल करत आहे.
याच पार्श्वभूमीवर भापज नेते गोपीचंद पळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्यातील इम्पेरिकल डाटा लवकरात लवकर गोळा करा, अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्विट ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन सरकारवर निशाणा साधला. पडळकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहित एक व्हिडिओ शेअर केला आहे. "आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका…लवकरात लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर, ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.