आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकारण:ऑनलाइन बकरा खरेदी बाबत राज्याचे मंत्री खोटे बोलत असून मुस्लीम समाजाला मूर्ख बनवत आहेत, भाजप नेते हाजी अराफात शेख यांचा आरोप

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवाब मलिक यांनी ऑनलाइन बकरा खरेदी केला का? अराफात शेख यांचा सवाल
Advertisement
Advertisement

राज्यात यावर्षी बकरी ईदच्या सणावर कोरोनाचे सावट आहे. बकऱ्यांच्या खरेदीवरून राज्यातील राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे बकरी खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन बकरी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी कुर्बानीसाठी ऑनलाइन बकरा खरेदी करा असे आवाहन मुस्लीम बांधवांना केले होते. या मुद्द्यावरून भाजप नेते खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याचे मंत्री खोटे बोलत असून मुस्लीम समाजाला मूर्ख बनवत असल्याचे भाजप नेते आणि महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफात शेख म्हणाले.

नवाब मलिक यांनी ऑनलाइन बकरा खरेदी केला का? अराफात शेख यांचा सवाल

नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी स्वत: तरी ऑनलाइन बकरे खरेदी केले आहेत का? कुर्बानीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची शहानिशा ऑनलाइन कशी केली जाणार? याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बकऱ्याच्या कुर्बानीविषयी कोणतीही माहिती न देता परस्पर निर्णय घेतला जात असल्याचा आरोपही हाजी अराफात यांनी केला.

ऑनलाइन बकरा खरेदी निर्णय घेताना खाटीक समाजाला विश्वासात घेतले नाही. ही मुस्लीम बांधवांची फसवणूक आहे. अशी टीकाही हाजी अराफात शेख अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर केली आहे.

Advertisement
0