आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा मलिकांवर निशाणा:'निराधार आरोप करण्याऐवजी मलिकांनी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी', भाजपचा पलटवार

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे

राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिविर विकू नका अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी धमकी केंद्राने कंपन्यांना दिली असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. यानंतर आता भाजपने मलिकांवर पलटवार केला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. 'अशा प्रकारचे निराधार आरोप करण्याऐवजी नवाब मलिक यांनी पुरावा द्यावा अन्यथा त्यांनी माफी मागावी. परिस्थिती ही गंभीर आहे, महाविकास आघाडी सरकारने दोष देणे थांबवायला हवे आणि कोरोना परिस्थिती हाताळायला हवी. तसेच ही जर राज्य सरकारची अधिकृत भूमिका असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः पुढे यावे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी. अन्यथा अशा प्रकारचे निराधार आणि बेजबाबदार आरोप करण्यापासून आपल्या मंत्र्यांना रोकावे' असे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?
नवाब मलिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकारने 16 निर्यात कंपन्यांना रेमडेसिविरसाठी विचारले तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की केंद्र सरकारने त्यांना महाराष्ट्रात औषध पुरवू नये असे सांगितले आहे. तसेच या कंपन्यांना धमकी देण्यात आली आहे की, जर त्यांनी तसे केले तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल. अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...