आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमय्यांचे ठाकरे कुटुंबावर पुन्हा आरोप:हे भूखंडाचे श्रीखंड करण्यात गुंतलेले सरकार, 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे? - किरीट सोमय्या

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का? असे अनेक प्रश्न सोमय्यांनी विचारले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली होती. यानंतर पासून भाजप सातत्याने महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहे. दरम्यान किरीट सोमय्यांनी ठाकरे आणि नाईक कुटुंबातील जमीन व्यवहारांविषयी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत त्यांनी आरोप लावले आहेत. हे सरकार भूखंडाचे श्रीखंड लाटण्यात गुंतलेले सरकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे असा सवालही त्यांनी विचारला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे सवाल केले आहेत.

भूखंडाचे श्रीखंड करण्यात गुंतलेले सरकार
किरीट सोमय्यांनी आरोप करत म्हटले की, 'ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचे श्रीखंड करण्यात गुंतलेले सरकार आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याविषयी बोललो होतो. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावे. जी जमीन 2 कोटी 55 लाखांमध्ये अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती 900 कोटीमध्ये विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील 354 कोटी यापूर्वीच दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच पुढे सोमय्या म्हणाले की, शिवसेनेच्या नेत्यांना मला सांगायचे आहे की, मी पुराव्यांशिवय बोलत नाही. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नसल्याने तुम्ही शिवीगाळ करता. दहिसर घोटाळ्याचे सर्व कागदपत्रे असून मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ती दाखलही करण्यात आली आहे.'

40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?
किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले की, 'ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईकांसोबत कसे? यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का? असे अनेक प्रश्न सोमय्यांनी विचारले आहेत. आता उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी याची उत्तरे द्यावी. 40 पैकी 30 जमीनींचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावे किंवा रश्मी ठाकरेंच्या प्रतिनिधीने द्यावे. आर्थिक व्यवहार करत आहेत याशिवाय मी कोणताही आरोप केलेले नाही. मी केवळ खुलासा मागितलेला आहे'

बातम्या आणखी आहेत...