आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 बंगल्यांवरुन सोमय्यांच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा:म्हणाले - रश्मी ठाकरे लबाडी करू शकत नाहीत, मात्र खुर्चीसाठी त्यांचे पती करू शकतात

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रश्मी ठाकरे लबाडी करू शकत नाही मात्र, पती लबाडी करू शकतात, असे म्हणत अलिबागच्या 19 बंगल्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंवर टीका केली. खुर्चीसाठी उद्धव ठाकरे लबाडी करतात. मी भ्रष्टाचार उघड केली म्हणून माझ्यावर हल्ला करण्यात आला, असे म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे सोमय्या यांनी काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेवर देखी टीका केली, ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व नकली असून, हे आता महाराष्ट्राला कळाले आहे. अजान बंद झाली म्हणून मुख्यमंत्र्यांची बोबडी वळली, आम्हाला असली नकली शिकवू नका, असे म्हणत सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

सोमय्या म्हणाले की, असली काय आहे आणि नकली काय आहे हे सांगाल का आपण? रश्मी उद्धव ठाकरे यांनी 23 मे 2019 ला एक पत्र महाराष्ट्र सरकारला लिहले आहे. त्यानंतर दुसरे पत्र लिहले 2 फेब्रुवारी 2021 ला त्यामुळे आमच्या रश्मी वहिनी कोणत्या असली आहे कोणत्या नकली आहे हे उद्धव ठाकरेच सांगू शकता, असे सोमय्या म्हणाले.

2019 च्या पत्रात रश्मी ठाकरे यांनी लिहले आहे की, अलिबागमध्ये माझे 19 बंगले आहेत. 2014 मध्ये मी ते अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतले, त्यामुळे ते माझ्या नावावर करा, मी त्यांना पैसे दिलेत. 2020 मध्ये या 19 बंगल्यांचा कर भरला. 1 एप्रिल 2009 पासून 2021 पर्यंत रश्मी ठाकरेंनी संपत्ती कर भरल्याचे देखील सोमय्या म्हणाले.

पुढे सोमय्या म्हणाले की, दुसरे पत्र 2021 चे आहेत, त्यात रश्मी ठाकरे म्हणत आहेत की, माझ्याकडे 19 बंगले नव्हतेच, एप्रिल 2014 मध्ये आम्ही ज्यावेळी जागा घेतली त्यावेळी देखील हे बंगले नव्हते, त्यामुळे दोन्ही पत्रातील कोणत्या रश्मी ठाकरे असली आहे आणि नकली, हे उद्धव ठाकरेंनी सांगावे, असे सोमय्या म्हणाले.

खोट्या रश्मी ठाकरे आहेत की, उद्धव ठाकरे आहेत, लबाडी कोण करतो रश्मी ठाकरे लबाडी करूच शकत नाही, पण त्यांचे पती मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी लबाडी करू शकतात. उद्धव ठाकरेंना आम्हाला असली नकली शिकवायचे धाडस करू नये, असे सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...