आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्याला धमकीचे फोन:धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जीवे मारण्याची धमकी; किरीट सोमय्या यांचा दावा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याप्रकरणी सोमय्या यांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे

धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे रविवारपासून आतापर्यंत 6 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यातील एकाने गोळी घालण्याची धमकी दिल्याचे ते म्हणाले. सोमय्या यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. सोमय्या यांनी धमकीचे आलेले फोन नंबरही सार्वजनिक केले आहे. किरीय सोमय्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर आरोपींचे फोटो शेअर केले आहेत.

फोन करणारा म्हणाला - डोक्यात 6 गोळ्या घालीन
सोमय्या म्हणाले की, रविवारी साडेअकरा वाजता त्यांना दोन धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्याने माझ्या डोक्यात 6 गोळा घालण्याची धमकी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत असे सहा धमकी देणारे कॉल त्यांच्याकडे आले. फोन करणारे त्यांना शिवीगाळ करीत असून जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

मुंडे यांच्याविरूद्ध बोलल्याबद्दल धमक्या: सोमय्या

सोमय्या यांच्यानुसार, धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरून जेव्हा ते बोलू लागले तेव्हापासून ते धमकीचे फोन येत आहेत. सोमय्या यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्नी, मुले व मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार केली होती.

किरीट सोमय्या यांनी सर्व आरोपींची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत

बातम्या आणखी आहेत...