आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना ठाकरे सरकारने दिलेली ट्रीटमेंट ही अयोग्य होती, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. आज या प्रकरणी त्यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची भेट घेत पाठपुरावा केला आहे. तर यासोबतच हवाला एन्ट्री ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी आणि उदय शंकर महावर यांच्या मनी लाँड्रिंगवरील कारवाई व्हावी यासाठी त्यांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
नवनीत राणा यांचा स्पाँडिलायसिस आजार बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन राणा दाम्पत्याची भेट घेतली. यावेळी राणा दाम्पत्याने आपले कारागृहातले अनुभव किरीट सोमय्यांना सांगितले. हे अनुभव ऐकून आपल्याला खूप मोठा धक्का बसला असून त्यांचे अनुभव ऐकून इंग्रजांच्या काळातल्या तुरुंगाची आठवण झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तर हनुमान चालिसा म्हटल्याने लोकप्रतिनिधीला 11 दिवस जेलमध्ये ठेवणाऱ्या माफीया सरकारची मला लाज वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
राणा दाम्पत्यानी मुख्यमंत्री ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची मागणी केली होती. यानंतर महाराष्ट्रभरात शिवसैनिक आक्रमक झाले होते. तणावपूर्ण वातावरणानंतर अखेर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. 12 दिवसांनी राणांची जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी आपल्याला कारागृहात अयोग्य वागणूक देण्यात आली असे म्हटले आहे.
किरीट सोमय्या दिल्लीच्या दौऱ्यावर
सोमय्या यांनी आज दिल्लीत जात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत चर्चा केली आहे. राणा दाम्पत्याला जेलमध्ये अयोग्य वागणूक देण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या वागणूकीची माहिती केंद्रीय यंत्रणाना देण्यासाठी त्यांनी आज भेटी घेतल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.