आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का?, असा सवाल शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प काय, शिवसेनाचा नेहमीच विकासकामांना विरोध असतो, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणतात की हुकुमशाही करून प्रकल्प केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू. त्यांना आज स्वत: ते कोण आहेत याची त्यांना जाणीव आहे का? हेच माहित नाही. पक्षातील 40 आमदार सोडून गेले आहेत. 10 ते 12 जण उरलेत. शिवसेनेची अवस्था आज राज्यातील देशातील कमी ताकदीचा पक्ष अशी झाल्याचे शरसंधानही त्यांनी साधले.
इतिहासातील एकमेव निकामी मुख्यमंत्री
नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करतायेत, असे म्हणत उद्धव ठाकरे हे अडीच वर्षात फक्त दोनदा येणारे इतिहासातील एकमेव निकामी मुख्यमंत्री होते, अशी जहरी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली, तसेच ते शरद पवार यांच्या कृपेमुळेच मुख्यमंत्री झाले होते, असेही नारायण राणे म्हणाले.
कोकणाबद्दल आस्था आहे की द्वेष?
नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, मी कोकणातला आहे. एनरॉन, जैतापूरला विरोध, हायवेला, सिंधुदुर्गात विमानतळ आले. जागा घेण्याच्या प्रक्रियेलाही विरोध, आजवर कोकणातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केलाय. कोकणाबद्दल आस्था, प्रेम आहे की द्वेष आहे. यांनी गेल्या अडीच वर्षात कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही. यांचे कोकणाच्या विकासात योगदान काही नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पैसे घेतल्याचा आरोप
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी न होऊ देण्यासाठी उद्योगपतीकडून पैसे घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर राज्यातील विकास कामांना शिवसेनेकडून कायम विरोध करण्यात आला आहे. दरम्यान अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले, त्यांच्या आमदार आणि खासदारांनी कोकणासाठी काय केले असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.