आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदुत्वावरून ठाकरेंवर निशाणा:मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काम केले नाही, पिंजऱ्यात बसून आहेत, अशांना सर्टिफिकेट कसे देणार?; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालघर हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे वर्ग करा, नारायण राणेंची मागणी

आमचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्याचा भाजप नेते नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री कोणत्याही परीक्षेला नाही तर पिंजऱ्यात बसून आहेत. त्यांनी कामच केले नाही, त्यांनी सर्टिफिकेट कसे देणार असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावला आहे. पालघर हत्याकांडप्रकरणी आयोजित जनआक्रोश रॅलीत ते बोलत होते.

पालघर साधू हत्याकांडप्रकरण सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी भाजप नेते राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी नारायण राणे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी एकही काम केले नाही. ते घरातच बसून असतात. पिंजऱ्याच्या बाहेर पडत नाहीत. ते कोणत्याही परीक्षेला बसले नाही आणि बसत नाहीत. त्यामुळे त्यांना सर्टिफिकेट कसे देणार, असे राणे म्हणाले.

दरम्यान पालघर प्रकरणी राज्य सरकारने योग्य तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे, असे राणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...