आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राष्ट्रवादीवर निशाणा:'पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच' नितेश राणेंचा राष्ट्रवादीला टोला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेने सामना अग्रलेखात लिहिले की, फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी काही आयपीएस अधिकाऱ्यांविषयी वक्तव्य केले होते. अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले होते. मात्र यानंतर त्यांनी मी असे बोललोच नसल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शिवसेनेने सामना अग्रलेखातून या विषयाला हात घातला आहे. यावेळी शिवसेनेने भल्या पहाटे भाजप आणि अजित पवारांनी घेतलेल्या शपथविधीविषयीही भाष्य केले. यावरुन आता नितेश राणेंनी टीका केली आहे.

शिवसेनेने सामना अग्रलेखात लिहिले की, फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते. यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी ट्विट करत म्हटले की, 'शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला.' असा दावा नितेश राणेंनी केला आहे.

सामनात काय लिहिले?
सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले. फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही.