आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांना कोरोना:भाजप नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण, स्वतःला केले सेल्फ क्वारंटाइन; प्रकृती उत्तम

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, राणेंचे आवाहन

राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अनेक नेते मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अशात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि भाजप नेता निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. निलेश यांनी सोमवारी ट्विट करून ही माहिती दिली. निलेश राणे यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करून घेतले आहे.

निलेश राणे यांनी ट्विट केले की, ''कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करून घेतले आहे.'' तसेच गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याआधी राज्यातील 7 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...