आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तार:प्रीतम मुंडेंना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या वृत्ताचे पंकजा मुंडेंकडून खंडन, म्हणाल्या - 'आम्ही सर्व मुंबईच्या घरी'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता कॅबिनेटचा विस्तार करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. संध्याकाळी 6 वाजता 43 मंत्र्यांचा शपथविधी होईल. यापूर्वी 11 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठकही घेतली आहे. दरम्यान मोदींया नव्या कॅबिनेटमध्ये यंग ब्रिगेडचा समावेश असेल असे वृत्त आहे. यामध्ये बीडच्या खासदार आणि भाजपा नेत्या प्रीतम मुंडे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या वृत्ताचे पंकजा मुंडे यांनी खंडन केले आहे.

प्रीतम मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार आणि त्यांचे नाव निश्चित असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या वृत्ताचे पंकजा मुडेंनी खंडन केले. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. 'खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वत: पाहिली. ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी, प्रीतम ताई, आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता कॅबिनेटचा विस्तार करणार आहेत. आज एकूण 43 मंत्री शपथ घेतली. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी होणाऱ्या नवीन मंत्र्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिंया आणि सर्बानंद सोनोवाल हे सर्वच संभावित मंत्री सामिल झाले. बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...