आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 कोटींची फसवणूक:भाजप नेते प्रसाद लाड यांना क्लीन चिट, आधी दरेकर, मग सोमय्यांनाही मिळाली क्लीन चिट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना क्लीन चिटच्या बंपर ऑफर सुरू झाल्या आहेत. मुंबई पोलिसांनी आता भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांना १० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. व्यापारी विमल अग्रवाल यांनी लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

भाजप नेते लाड यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावा नाही :

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१४ सालच्या याप्रकरणी न्यायालयामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण दिवाणी वादाचे असून त्यात लाड यांना आरोपी बनवण्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ प्रकरणात नीलही ‘क्लीन’
1. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबई बँक) आर्थिक अनियमितता प्रकरणात भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
2. ‘सेव्ह आयएनएस विक्रांत’ मोहिमेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...