आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लावणी सम्रज्ञीच्या पक्ष प्रवेशावर वादंग?:राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दीक खडाजंगी सुरु आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. सुरेखा पुणेकर या 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरेकरांनी पक्ष प्रवेशावरुन 'राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे.' ते आज पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळाव्याप्रसंगी बोलत होते. आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते पुढे म्हणाले की, "हा पक्ष सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष असल्याने गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार
राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत आहे. आपल्या पक्षातील महिलांची काय स्थिती असेल हे आपल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...