आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद अख्तर यांच्यावर टीका:...हेच वक्तव तालिबानमध्ये केले असते तर त्यांना चौकात फटके मारले असते; भाजप नेत्याची टीका

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाप्रती त्यांची भूमिका नेहमीच संशयास्पद

गीतकार जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर भाजपसह इतर समविचारी पक्ष, संघटना आक्रमक झाल्या आहेत. या विधानाबाबत जावेद अख्तर यांनी जाहीर माफी मागावी अशी भूमिका या समविचारी पक्षांनी घेतली आहे. तर दुसरीकडे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जावेद अख्यर यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली आहे. "जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबान मध्ये केले असते तर त्यांना चौकात फटके मारले असते' अशी टीका मुनगंटीवार यांनी एपीबी माझाच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

देशाप्रती त्यांची भूमिका नेहमीच संशयास्पद
सुधीर मुनगंटीवार बोलताना पुढे म्हणाले की, जावेद अख्तर यांची भूमिका देशाच्या बाबतीत नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे. त्यांनी हेच वाक्य जर अफगाणिस्तानात जाऊन म्हटले असते तर त्यांना भर चौकात फटके मारले असते असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लावला आहे. जर या संघटना तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या तर जावेद अख्तर यांचे हाल तिथल्या सारखे झाले असते असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते जावेद अख्तर?
अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांनी देशातील काही हिंदू संघटनांवर टीका केली होती. आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील असे कडक शब्दांत त्यांनी टीका केली होती. यानंतर भाजपने अख्तर यांच्यावर आक्रमक भूमिका घेत अटक करण्याची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...