आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांच्या वक्तव्यावर भाजपची सावध भूमिका:कोणत्या संदर्भात बोलले माहित नाही- बावनकुळे, मुनगंटीवारांनी दिले पवारांचे उदाहरण

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतिसंह कोश्यारींविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, भाजप नेत्यांनी यावर सावध भूमिका घेतली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर राज्यपाल कोणत्या संदर्भात बोलले, हे आपल्याला माहितीत नाही, असे सांगत या प्रकरणावर कानावत हात ठेवले आहेत. तर, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यपालांना तसे म्हणायचे नव्हते, अशी सारवासारव केली आहे.

मुनगंटीवार म्हणाले...

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालबाह्य हा शब्दच वापरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लोक 'जाणता राजा' म्हणायचे. त्यामुळे शरद पवारांची शिवाजी महाराजांशी तुलना केली असे होत नाही. तसेच, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही काही लोक प्रतिशिवाजी म्हणायचे. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे प्रतिशिवाजी होते का? आपण उदाहरण देताना प्रतिकात्मकता म्हणून ते वापरतो. दोन भावांमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण आहेत, असे म्हणतो. यात कोणाचा अनादर करण्याचा हेतू नसतो.

बावनकुळे म्हणाले...

राज्यपालांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपाल नेमक्या कोणत्या संदर्भात बोलले हे माहीत नाही. मात्र, छत्रपती शिवराय हे सर्वांचे आदर्श असून, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. तसेच, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी आधी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि नंतर सावरकरांवरील प्रेम सिद्ध करावे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसधारर्जीणे झाले आहेत. त्यामुळेच त्यांना आमचं सावकरांबद्दलचे आंदोलन दिखावू वाटते, अशीही टीका त्यांनी केली.

राऊतांची सडकून टीका

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान वैगरे शब्दच्छल करीत भाजपने शिवसेना फोडली व एक मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजमहाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? भाजपचीदेखील हीच भूमिका आहे का? संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय.

बातम्या आणखी आहेत...