आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:भाजप नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे, त्यांचा खोटारडेपणा सिद्ध करू; स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर काँग्रेसचे आव्हान

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते - सचिन सावंत

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला, पण भाजप नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करूनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. भाजप नेत्यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस यावे, मी त्यांचा खोटारडेपणा पुराव्यासह सिद्ध करून दाखवण्यास तयार आहे, असे जाहीर आव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

सावंत म्हणाले, सर्व पॅसेंजर रेल्वे या सबसिडीवरच चालतात. केवळ स्लीपर क्लासचेच नाही, तर फर्स्ट क्लासचे तिकीटही सबसिडाइज्ड असते. मजुरांच्या रेल्वे भाड्याचा ८५ टक्के खर्च केंद्र करते, असे गेले महिनाभर सांगत होते. हा खोटेपणा पकडल्यावर आता तेही ८५ टक्के सबसिडी आहे, असे म्हणत आहेत. या देशातील सर्व पॅसेंजर वाहतूक ही सबसिडीवरच चालते. हा खर्च मालवाहतूक व कमर्शियल मार्केटिंगमधून भरून काढला जातो. रेल्वेने १ जानेवारी २०२० ला भाडेवाढ केली त्या वेळी असलेल्या स्लीपरच्या तिकीट भाड्यात आता श्रमिक स्पेशलकरिता ५० रुपये वाढ केली आहे, हा असंवेदनशीलपणा नव्हे काय? जर कोविड अगोदर ५० रुपये स्वस्त तिकीट मिळत होते तर कोविडसाठी मोदी सरकारने काय दिले, या प्रश्नाचे उत्तर भाजपने द्यावे. या संकटकाळाची तुलना कमर्शियल सर्व्हिसबरोबर करणे ही असंवेदनशिलता आहे.

केंद्र सरकारला स्थलांतरित मजुरांकरिता खर्च करण्याची इच्छा नव्हती म्हणूनच ही जबाबदारी राज्य सरकारवर टाकण्याची कावेबाजी यात होती. परंतु देशात टीका होईल या भीतीने भाजप नेते खोटे बोलत होते. या देशात ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते दुर्दैवाने अप्रामाणिक व असंवेदनशील आहेत. देशात सर्व राज्यांना व जनतेला केंद्र सरकारने दिलेला कर्ज काढण्याचा सल्ला हा केंद्र सरकारने रेल्वेला का दिला नाही? स्थलांतरित मजुरांच्या आजच्या हलाखीच्या परिस्थितीला केंद्र सरकारचा तुघलकी कारभार कारणीभूत आहे. रेल्वेमंत्र्यांना एक रेल्वेही धड नीट चालवता येत नाही., असा आरोप त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...