आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदाराचे पत्र:मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे, भाजप आमदार अमित साटम यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला

भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेसंदर्भात पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेनेने मुंबईमध्ये जवळपास 30 वर्षे सत्ता गाजवली, मात्र मुंबईत मराठीची अवस्था बिकट झाली तसेच मराठी माणूस बाहेर फेकला आहे. यासोबतच मराठी शाळांची आणि भाषेची अवस्था देखील तशीच झाली आहे असे म्हणत अमित साटम यांनी पत्र पाठवले आहे. तसेच त्यांनी मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे असे म्हणत कविवर्य कुसुमाग्रज यांचीही आठवण करुन दिली आहे.

अमित साटम पत्रामध्ये म्हणाले की, 'मराठी अस्मितेचा आधार घेत शिवसेनेने गेले 30 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर सत्ता राबवली. याचे निष्कर्ष म्हणजे मुंबईतील मराठी शाळांची आणि मराठी भाषेची झालेली अधोगती उभा महाराष्ट्र पाहतोय. मुंबईमध्ये 2010 साली महानगरपालिकेच्या 413 मराठी शाळा होत्या आता तीच संख्या 282 वर आलेली आहे. त्याचेच पडसाद विद्यार्थी संख्येवर पडलेले आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री यांना आपल्याच घरात मराठी हाल सोसत असल्याची जाणीव करून देणारे पत्र देखील लिहिलेले आहे. या निमित्ताने मराठी भाषा मंत्रालयासमोर कश्या प्रकारे भीक मागत उभी आहे याची जाणीव त्यांना व्हावी अशी आशा आहे.'

साटम यांच्या पत्रात काय?
आपणास ज्ञात असेल की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 107 हुतात्म्यांनंतर दि.1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलीदानाची सदैव आठवण करून देत असेलच!

सत्ताधारी सेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षात मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे,याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब ??

सन 2010 -2011 मध्ये मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या 1,02,214 होती. आता सन 2020-2021 मध्ये शाळांची संख्या फक्त 2 राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त 36,114. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर 2013 नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही.

आपणास पत्र लिहण्याचे कारण की मला मिळालेल्या माहितीनुसार मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर 2020- 2028 सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही.

ज्या मायमराठीने गेली 30 वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. “मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे”

बातम्या आणखी आहेत...