आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन धमकी देण्यात आली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती आशिष शेलार यांनी पोलिसांना केली आहे.
याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह इतर ठिकाणाची दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेकडून रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रँच तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना डिसेंबर महिन्यात धमकीचे पत्र आले होते. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.