आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:''शिवथाळीच्या यशानंतर 'शिव दवाखाने' येणार, येथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असणार'' : भाजप आमदाराची संजय राऊतांवर टीका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं असे वक्तव्य केले होते. आता या वक्तव्याने राज्यात चांगलाच वादंग पेटला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने राऊतांनी समस्त डॉक्टरांनी माफी मागावी असा इशारा दिल्यावर राऊतांनी सारवासारवी केली. मात्र राऊतांच्या या वक्तव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खरपूस समाचार घेतला.

शिव वडापाव आणि शिव थाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने येत आहेत. मात्र इथं डॉक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

एका खासगी वृत्ताहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राऊत म्हणाले होते की, WHO ला काय कळतं. तिथे सर्व डॉक्टर असले तरी इकडून-तिकडून माणसे गोळा केलेली असतात. डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं. मी तर नेहमी कंपाउंडरकडून औषध घेतो. WHOच्या नादाला लागले म्हणूनच कोरोना वाढला आहे.

डॉक्टरांच्या विरोधानंतर संजय राऊतांचा युटर्न

या वक्तव्यानंतर मात्र राज्यातील विरोधी पक्षांकडून आणि डॉक्टरांकडून होणारा विरोध लक्षात घेता राऊतांनी युटर्न घेतला आहे. “डॉक्टरांचा अपमान केला असे नाही. मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे” असे म्हणत त्यांनी सारवासारवीचा प्रयत्न केला. मात्र राऊतांच्या या विधानावर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नसल्याची बाब सध्या दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...