आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतुल भातखळकरांचे आव्हाडांवर टीकास्त्र:पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्टटाईम इतिहासकार, पवार पट्टशिष्य, ब्रिगेड आधारस्तंभ आव्हाड आता पार्टटाईम अर्थशास्त्री झालेत, या शब्दात भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली होती. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, 3.5 ट्रिलियनचा टप्पा गाठून आपण इंग्लंडला मागे सारले ही त्यांच्या दृष्टीने achivement नाही. पण मग हे 70 वर्षात काँग्रेसला का झेपले नाही?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हे शक्य कसे झाले? असा सवाल त्यांनी केला.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

भारताने 3.5 ट्रिलियन डॉलर जीडीपीचा टप्पा पार केला व ब्रिटनला मागे टाकत जागतिक क्रमवारीत भारताने 5 वे स्थान पटकावल्यानंतर भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव झाला. यावर जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले होते की, 'इंग्लंडचा जीडीपी 3.2 ट्रिलियन आहे. भारताचा 3.5 ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त 6.8 कोटी लोकांचे कल्याण करायचे आहे. आपल्याला 140 कोटी लोकांचे कल्याण करायचे आहे. किमान शालेय पातळीवरचे अर्थशास्त्र शिका हो, असे म्हणत टोला लगावला होता.

याआधी आव्हाडांनी आणखी एक ट्वीट करत भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, 'भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. प्रथमच भारतावरील इतर देशांचे कर्ज अर्थात विदेशी कर्ज एकूण ६२०.७० अब्ज डॉलर्स पार गेले असून ते परकीय चलन साठ्यापेक्षा अधिक झाले आहे. एकीकडे महागाईने कहर केलेला असताना देशावर मोठ्या प्रमाणावर वाढते कर्ज कशाचे द्योतक आहे?'

बातम्या आणखी आहेत...