आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्सलाम वालेकुम लाचारांनो...:...ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा? अतुल भातखळकरांचा ट्विट करत सवाल

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. सिल्लोड येथील सुषमा अंधारेंच्या सभेचा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा चालली आहे. अस्सलाम वालेकुम लाचारांनो, असा मजकूर लिहला आहे.

गेली काही दिवस शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. सुषमा अंधारेंची कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्या मतदारसंघात सभा झाली. यावेळी त्यांनी सत्तारांवर टीका करताना कुराण शरीफचा हवाला देत सत्तारांवर टीकास्त्र डागले होते.

काय म्हटलंय अंधारेंच्या व्हिडिओत

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पोस्ट केलेला सुषमा अधारेंचा हा व्हिडीओ एका सभेतील आहे. या सभेत अंधारे उपस्थितांसमोर कुराणविषयी बोलताना दिसत आहेत. त्या म्हणतात, “कुराण शरीफमध्ये सांगितले आहे की, इस्लाममध्ये पाच कर्तव्य सांगितली आहेत. खरा मुस्लीम तोच असतो जो दिवसात पाचवेळा नमाज पठण करतो.

दुसरे कर्तव्य रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळणे हे आहे. तिसरे कर्तव्य आपल्या कमाईतील 20 टक्के जकातमध्ये देणे, चौथे कर्तव्य आयुष्यात एकदा हजला जाणे आणि पाचवे कर्तव्य म्हणजे जेव्हा अल्लासमोर तुमच्या कामांचा हिशोब द्यायची वेळ येईल तेव्हा तुमची मान लज्जेने खाली झुकायला नको, असे सुषमा अंधारे उपस्थितांना सांगत आहेत.

बातम्या आणखी आहेत...