आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लौंगिक अत्याचार प्रकरण:भाजप आमदार गणेश नाईकांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे आमदार गणेश नाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. एका महिलेकडून नाईकांविरोधात लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. कारण ठाणे सत्र न्यायालयाने नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. गणेश नाईक या प्रकरणापासून फरार असून त्यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र आता उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

नाईकांचे प्रकरण नेमके काय?
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली 27 वर्ष एका महिलेसोबत राहत तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप गणेश नाईक यांच्यावर करण्यात आलाय. या आरोपांची पोलिसांआधी महिला आयोगाने दखल घेतली होती. आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा असे म्हटले होते. गणेश नाईकांवर नवी मुंबईतल्या दोन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. याप्रकरणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आमदार नाईक यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. हा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आमदार नाईक यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि अखेर हायकोर्टाने आज आमदार गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचेही म्हटलंय.

गणेश नाईक आता समोर येणार?
गेली अनेक दिवस नॉटरिचेबल असलेले आमदार नाईक हे आता उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता रिचेबल होणार का असा सवाल अनेकांना पडला आहे. हायकोर्टाने दिलासा दिल्यानंतर नाईक त्यांच्यावरील आरोपावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...