आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात घातला गोंधळ, पोलिसांनी दाखल केला गुन्हा; नगरसेवकाच्या अटकेवर झाले होते नाराज

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी आमदारावर गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप अटक केली नाही

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी 14 ऑगस्ट रोजी कल्याणच्या कोळशेवाडी पोलिस ठाण्यात घातलेल्या गोंधळानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी कोणालाही अटक झाली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये भाजप आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालताना आणि पोलिसांनीशी हुज्जत घालताना दिसून आले.

एका जमिनीच्या वादावरून ही घटना सुरू झाली

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी एका जमिनीच्या विवादावरून भाजप नगरसेवक आणि काही लोकांनी मारहाण झाली. भाजप नगरसेवक मनोज राय तक्रार नोंदवण्यासाठी आपल्या मुलांसोबत पोलिस ठाण्यात गेले. येथे पोलिसांनीच मनोज राय आणि त्यांच्या मुलांना तुरुंगात टाकले. याबाबतची माहिती कल्याण (पूर्व)चे भाजप आमदार गणपत गायवाड यांना समजल्यानंतर ते कोळशेवाडी पोलिस ठाण्यात गेले आणि गोंधळ घातले. यावेळी त्यांनी पोलिसांना धमकी देखील दिली.

आमदारावर गुन्हा दाखल

आमदार गायकवाड यांनी जवळपास एक तास गोंधळ घातला. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहुराज साळवे यांना खरे-खोटे सुनावले. यादरम्यान इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी बघ्यांची भूमिका घेतली होती. आता याप्रकरणी गोंधळ घालणाऱ्या आमदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक केली नाही.

बातम्या आणखी आहेत...