आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती हिंसाचार:"त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात; औरंगजेबचे नव्हे", अमरावती हिंसाचाराची नितेश राणेंनी केली मराठा आरक्षणाशी तुलना

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात मुस्लिम समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. त्यादरम्यान अमरावती, नांदेड आणि मालेगावसह मुंबईतील भिवंडीमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. अमरावती झालेल्या हिंसाचारानंतर आज भाजपच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. आज पुन्हा अमरावतीत हिंसाचाराची घटना घडली आहे.

आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलीसांनी लाठीचार्ज करावा लागला. यासर्व पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी हिंसेची निंदा केली आहे. राणे यांनी हिंसाचाराची तुलना मराठा आरक्षणाशी केली आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मुक मोर्चा अतिशय शांत पद्धतीने पार पाडतो. यात कोणालाही त्रास दिला जात नाही. असे शांतेत मोर्चे काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात. औरंगजेबाचे विचार चालत नाही. असे राणे म्हणाले.

राणे यांनी ट्विट केले आहे की, 'मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले कालच्या पेक्षा मोठे पण कोणाला ही त्रास झाला नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात. औरंगजेबचे नाही !!!' असे ट्विट राणे यांनी केले आहे.

भाजपची बंदची हाक, पुन्हा दंगल
भाजपने आज अमरावती जिल्ह्यात बंदचे आवाहन केले असताना आज अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यात गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. जी दुकाने सुरू आहे त्याला बंद करा. अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. आंदोलक 'जय श्री राम' च्या घोषणा देत असून, त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या आहेत.

सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आंदोलकांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शुक्रवारी मुस्लिम समाजाने बंद पुकारले होते, शुक्रवारी दुपारी नमाज अदा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन काढण्यात आले होते.

त्याच दरम्यान चित्रा चौकातील काही दुकाने सुरू दिसली. आंदोलकांनी दुकानदारांना बंद करण्याची विनंती केल्यानंतरही दुकान बंद न केल्याने आक्रमक आंदोलनकर्त्यांनी दुकानांवर दगडफेक केली. या दगडफेकीत शहरातील सुमारे 20 ते 22 दुकांनाची तोडफोड करण्यात आली होती.

गृहमंत्र्यांचे आवाहन
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने संपुर्ण राज्यात आज आंदोलक केले. त्यात नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही शहरांमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. मी सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांना शांततेत राहण्याचे आवाहन करतो. असे वळसे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...