आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञातावासातून बाहेर:भाजप आमदार नितेश राणे अखेर अज्ञातावासातून बाहेर; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे केले स्वागत

सिंधुदुर्ग4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 15 दिवसांपासून फरार झालेले भाजप आमदार नितेश राणे अखेर आज अज्ञातावासातून बाहेर आले आहेत. त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे आपल्या हाताने स्वागत केले आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यापुर्वी त्यांना अटकेपासून दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. पंधरा दिवसापासून गायब झालेले राणेंनी यावेळी पत्रकारांशी कोणत्याही प्रकारे भाष्य केलेले नाही.

सोमवारी होणार सुनावणी

भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील आज मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालय याप्रकरणी सोमवारी आपला फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आलेला आहे. शिवेसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहे.

सोबतच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना देखील नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधानभवनाच्या पायऱ्यावर बसुन म्यॉव म्यॉव करत खिल्ली उडवली होती. या दोन्ही घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने आज न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर न्यायालय सोमवारी आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...