आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:रामभक्तांना भिकारी म्हणता, शिवसेनेचे हे कसले हिंदुत्व? भाजप आमदार राम कदम यांचा सवाल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागावी, राम कदम यांची मागणी

भाजपचे नेते राम मंदिराच्या निधी संकलनाच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती आहेत. इतरांसारखे भिकारी नाहीत, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावरून भाजप आमदार राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधत हे शिवसेनेचे कसले हिंदुत्व असा सवाल उपस्थित केला आहे.

अब्दुल सत्तार यांनी राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणाऱ्यांना भिकारी म्हटल्याने रामभक्तांचा अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व रामभक्तांची तातडीने माफी मागितली पाहिजे अशी मागणी कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. राम मंदिराच्या उभारणीत प्रत्येक रामभक्ताला योगदान द्यायचे आहे. राम मंदिरासाठी आपण किमान एकतरी वीट द्यावी, अशी भावना प्रत्येक हिंदुच्या मनात आहे. पण शिवसेनेचे मंत्री त्यांना भिकारी म्हणतात. शिवसेनेचे हे कोणत्या प्रकारचं हिंदुत्व आहे, असा सवाल देखील राम कदम यांनी विचारला.

बातम्या आणखी आहेत...