आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपचे आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणात राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. त्यांच्या निवासस्थानापासून या या यात्रेला सुरुवात होणार होती. दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राम कदमांनी सरकारवर टीका केली आहे. 'आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न' असल्याचे ते म्हणाले. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान राम कदामांनी यापुर्वी जनआक्रोश यात्रा काढण्याचे जाहीर केले होते. यानुसार बुधवारी 8.30 वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार होते. पालघर हत्याकांडाला 211 दिवस उलटून गेले. तरीही अजुनही कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती.
16 एप्रिलला पालघरमध्ये दोन साधु आणि एक ड्रायव्हरची मारहाण करत हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर महाराष्ट्र सरकारवर भाजपकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, कोरोना लॉकडाऊन आणि कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी कदम यांना पालघर जाण्यापासून रोखण्यात आले आहे.
ताब्यात घेतल्यानंतर कदम यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, 'आम्हाला पालघर येथे जाण्यापासून सरकार रोखत आहे, कुणा-कुणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल?' असा सवाल कदमांनी केला आहे.
हमे पालघर जाने से महाराष्ट्र सरकार रोक रही है किस किस आवाज दबोचने की कोशिश करोगे? #palgharsadhulynching
— Ram Kadam - राम कदम (@ramkadam) November 18, 2020
अशी झाली होती साधुंची हत्या
पालघरच्या गडचिंचले गावात 16 एप्रिलला दोन साधु आणि त्यांच्या वाहन चालकाची जवामाने चोर समजून मारहाण करत हत्या केली होती. ते लोक सूरतला जात होते. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात जवळपास 154 लोकांना अटक करण्यात आली आहे आणि 11 अल्पवयीनही ताब्यात आहेत. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सीआयला सोपवण्यात आली आहे. ज्यांनी न्यायालयात तीन आरोपपत्र दाखल केले आहेत. पालघर जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंग यांनाही सरकारने रजेवर पाठवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.