आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया वॉर:मग, काय सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्यांची सुद्धा चौकशी करणार? भाजप आमदारांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना लिहिले पत्र

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर अनेक कलाकारांची होत आहे चौकशी

क्रिकेटर सचिन तेंडूलकर, लता मंगेशकरांसह अनेक कलाकारांच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजप महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असल्याचे दिसत आहे. आता भाजप आमदार राम कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे. या ट्विटमध्ये तपासाचे आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. यासोबतच केंद्र सरकारविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करुन त्याच्या ट्विटला काँग्रेसी ट्विट म्हटले आहे.

या पत्रामध्ये लिहिले आहे की, सोनम कपूर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, अली फजलसह अनेक कलाकारांच्या ट्विटमध्येही अनेक शब्द आणि हॅशटॅग कॉमन आहेत. तुम्ही या कलाकारांच्या ट्विटचीही चौकशी करणार का? असा सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.

राम कदम यांनी लिहिले की, 'काँग्रेसच्या भाषेमध्ये परदेशी षडयंत्रकारीचे समर्थन ट्वीट करणाऱ्या सेलिब्रिटीची चौकशी कधी करणार? आणि भारत रत्नांच्या लतामंगेशकर, सचिन तेंडूलकर, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या' अशी मागणी राम कदमांनी केली आहे.

पुढे कदमांनी पत्रात लिहिले की, '91 वर्षांच्या भारतरत्न लता दीदी आणि 24 वर्षे क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या तपश्चर्येने देशाला मोठे नाव मिळवून दिले त्या सचिन तेंडूलकरची आपण चौकशी करुन महाराष्ट्र सरकार त्यांचा अपमान करत आहे. आपण चौकशीचे आदेश ताबडतोब परत घ्यावेत ही विनंती' असे कदमांनी लिहिले आहे.

काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर अनेक कलाकारांची होत आहे चौकशी
सचिन तेंडूलकर आणि लता मंगेशकरसह अनेक दिग्गजांनी आंदोलनादरम्यान देशाला एकजुट राहण्याचे मॅसेज दिले होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखख यांनी या सर्व कमेंट्सच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या यादीमध्ये विराट कोहली, कंगना रनोट, अक्षय कुमार, अजय देवगन यांचाही समावेश आहे. राज्याला संशय आहे की, त्यांनी या कमेंट केंद्राच्या दबावात दिले होते. हा दावा मुंबई काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...