आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:भाजपकडून विधान परिषदेसाठी चार उमेदवारांची नावे जाहीर, 'या' मोठ्या नेत्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपकडून परत एकदा निष्ठावंतांच्या पदरी निराशा

अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली. येत्या 21 मे ला विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका होणार आहेत. दरम्यान, भाजपकडून विधानसभेत डच्चू मिळालेल्या नेत्यांना यावेळी उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. परंतू, यावेळीही निष्ठावंतांच्या पदरी निराशा पडली आहे. भाजपने विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यात माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांच्या नावावर शिक्कामोतर्ब झाला आहे. 

भाजपाकडून यावेळी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी शक्यता होती. परंतू, भाजपे यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या काही पक्षविरोधी वक्तव्यामुळे त्यांना डावल्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण काहीपण असो, पण भाजपच्या या निर्णयामुळे पक्षात नाराजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजपचे विधान परिषदेचे चारही उमेदवार विधानभवनात दाखल झाले असून, आजच फॉर्म भरणार आहेत. 

कोणत्या पक्षाच किती संख्याबळ?

सध्या रिक्त झालेल्या जागेत भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल पाहता, भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...