आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:शरद पवारांवरील टीका पडळकरांना पडणार महागात, लक्ष्मण माने म्हणतात - उंटाच्या बुडक्याचा मुका घेऊ नये नाहीतर दात पडतात

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पडळकर भावनेच्या भरात बाेलले : देवेंद्र फडणवीस
  • अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तर आंदोलनाला सुरूवात केली आहे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धनगर आरक्षणाचे फक्त राजकारण करावयाचे आहे. त्यामुळे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, अशी बेताल विधाने करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. ही टीका आता पडळकर यांना चांगली महागात पडणार असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह शिवसेनेकडूनही या वक्तव्याचा विरोध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर अकोल्यात आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर लक्ष्मण माने यांनी पडळकरांवर त्यांच्या खास शैलीत टीका केली आहे. 

लक्ष्मण मानेंनी पडळकरांवर खास शैलीत टीकास्त्र साधले आहे. लक्ष्मण माने म्हणाले की, पडळकरांनी आपल्या कुवती प्रमाणे वागायला हवे. उंटाच्या बुडक्याचा मुका घेऊ नये नाहीतर दात पडतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच पडळकरांचे पूर्ण जीवन आहे तेवढ पूर्ण सार्वजनिक राजकीय आयुष्य शरद पवारांच आहे. शरद पवार हे कधीच जातीयवादी वागलेले नाही. पडळकरांनी धनगरांच्या चळवळी केल्या मग ते जातीयवादी नाही का..? असा सवालही त्यांना विचारण्यात आला. यासोबतच पडळकर खरे तर RSS वाले आहेत मी जाहीर शब्दात निषेध करतो असे म्हणत त्यांनी पडळकरांवर निशाणा साधला आहे. 

दरम्यान पडळकरांच्या या वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला आहे. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तर आंदोलनाला सुरूवात केली आहे. यासोबतच अकोल्यात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी दिल्या पडळकर मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या आहे. यासोबतच पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. शरद पवारांवर केलेली टीका गोपीचंड पडळकरांना चांगली भोवणार असल्याचं दिसत आहे. 

काय म्हणाले होते पडळकर?
आमदार पडळकर हे बुधवारी पंढरपूर येथे आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली असून ती पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे अजेंडा नाही, भूमिका नाही आणि व्हिजनदेखील नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकावयाचे, त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि त्यांच्यावरतीच पुन्हा अन्याय करण्याची नेहमी भूमिका राहिली आहे, असा आरोप त्यांनी केला.

पडळकर भावनेच्या भरात बाेलले : देवेंद्र फडणवीस
शरद पवार हे अामचे शत्रू नाहीत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर पडळकर यांनी केलेली टीका चुकीची अाहे. पडळकरांच्या भावना तीव्र हाेत्या. भावना कठाेर असतात, पण त्या मांडण्यासाठी याेग्य शब्द वापरावे लागतात. यासंदर्भात पडळकर यांच्याशी मी बाेललाे अाहे. ते याबाबतीत सुधारणा करून घेतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...