आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसत आहे. पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे केंद्र सरकारवरर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. अर्थसंकल्पात देखील कोणताही दिलासा देण्यात आला नाही. विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहेच. पण आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी 'रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लीटर असे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करून वाढत्या इंधन दरावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी अनोख्या शैलीमध्ये हे ट्वीट केले आहे. एक भावनिक मुद्दा पुढे करत त्यांनी आपल्याच सरकारला हा टोला लगावला आहे. 'रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये 53 लिटर दर आणि रावनाच्या लंकेमध्ये पेट्रोलचे दर 51 रुपये लिटर आहे' असे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत.
— Subramanian Swamy (@Swamy39) February 2, 2021
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच स्पष्ट बोलत असतात. यावेळी ते आपलेच सरकार आहे याचा विचार न करताच स्पष्ट मत व्यक्त करतात. यामुळे अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे पक्षाला अडचणी येतात. यापूर्वीही त्यांनी आयटी भाजपच्या आयटी सेलवरुन आपल्या पक्षावर टीका केली होती. यासोबतच राम मंदिराच्या मुद्यावरून सुद्धा स्वामी यांनी पक्षावर टीका केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.