आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:तुमच्याकडून होत नसेल तर फडणवीसांच्या हाती पुन्हा सत्ता द्या, ते आरक्षण देतील याची मी जबाबदारी घेतो : उदयनराजे भोसले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयनराजे भोसले - फाइल फोटो - Divya Marathi
उदयनराजे भोसले - फाइल फोटो
  • आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे यांचे सरकारला थेट आव्हान

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात यावरून वातावरण चांगलंच तापले आहे. उदयनराजे भोसले यांनी मराठा मोर्चाचे प्रतिनिधित्त्व करावे अशी मागणी समाजातून केली जात आहे. त्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले. उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

फडणवीसांनी करून दाखवले आता तुम्ही करून दाखवा

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात करुन दाखवले होते, पण आज त्यांना नावे ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा,’ असे थेट आव्हानच उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिले.

मराठा समाजावर ज्यांनी अन्याय केला तेच आता सत्तेत बसले आहेत,

शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचे कामच आजपर्यंत झाले अशी टीकाही उदयनराजे यांनी सरकारवर केली आहे. राजकारणापोटी मराठा समाजाची अनेक प्रश्न प्रलंबित ठेवली आहेत. फक्त राजकारणासाठी मराठा आरक्षणाचा वापर केला जात आहे. मराठा समाजावर ज्यांनी अन्याय केला तेच आता सत्तेत बसले आहेत, अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी ठाकरे सरकारवर केली. मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण का नाही दिले? असा सवाल देखील उदयनराजे यांनी विचारला आहे.

इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये

जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर समाजावर अन्याय झाला तरी त्यांचीही बाजू मांडत आलेलो आहे. इतर समाजाच्या लोकांनी गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

मराठा समाजाने काय पाप केले आहे?

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत जेवढे मराठा आणि अन्य समाजाचे खासदार-आमदार आहेत, त्या सर्वांची मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी असल्याचं आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे. सर्वाना न्याय मग आमच्यावर अन्याय का? मराठा समाजाने काय पाप केले आहे? असे सवाल करत आणखी किती दिवस वाट पाहणार? असेही उदयनराजे यांनी म्हणले आहे. जातीमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

> जातीचे राजकारण करणाऱ्यांनी राजीनामे द्यावे.

> मराठा समाजाला किरकोळीत घेऊ नका, उदयनराजेंचा इशारा

> मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही याचा त्या-त्या वेळच्या सत्तेतील नेत्यांना प्रश्न विचारा.

> इतर समाजातील नागरिकांनी गैर समज करून घेऊ नये. मात्र मराठा समाजावर अन्याय होतोय तो दूर व्हावा.

> इतर कोणत्या ही समाजाचे आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या.

> मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सर्वांना माझा सवाल आहे

> आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवर दबाव आणला जातो आणि त्यांना तुरुंगात टाकले जाते.

> मराठा समाजाचा केवळ मतासाठीच वापर केला गेला.

> स्वतःचे बघा मग देवेंद्र फडणवीसांवर आरोप करा

> फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा, ते आरक्षण देतील याची मी जबाबदारी घेतो

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser