आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला, 'ते' तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात आहेत, नारायण राणेंची खरपूस टीका

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याची अवस्था दयनीय, मात्र मुख्यमंत्री गेले काही महिने मंत्रालयातच गेले नाहीत, ते तर 'मातोश्री'च्या पिंजऱ्यात, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

राज्यभरात कोरोनाने कहर केला आहे. दरम्यान राज्यातील राजकारणही तापलेले दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका होताना दिसत आहे. तसेच या सरकारमध्ये सन्मवयाचा अभाव असल्याचेही वारंवार बोलले जात आहे. आता भाजपच्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्याची अवस्था दयनीय आहे. मात्र मुख्यमंत्री हे गेले काही महिने मंत्रालयातच गेलेले नाहीत. ते तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात असल्याची खोचक टीका नारायण राणेंनी केली आहे. 

तसेच नारायण राणेंनी ठाकरे सरकारमध्ये सन्मवयाचा अभाव असल्याची टीकाही केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिन्ही सरकारमध्ये मतभेद आहेत. शिवसेना तर कोणाला विचारतच नाही.  तसेच महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही, त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती असेही राणे म्हणाले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये एकच मुख्यमंत्री नाहीत. तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. 

मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना नारायण राणे म्हणाले की, राज्याची अवस्था दयनीय आहे. मात्र मुख्यमंत्री गेले काही महिने मंत्रालयात गेलेलेच नाहीत. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे. मुख्यमंत्री 'मातोश्री'च्या पिंजऱ्यात आहेत. ते मंत्रालयात येत नसतील तर मंत्रालयाचं नाव पुन्हा सचिवालय करा अशी टीकाही त्यांनी केली. तसेच  ठाकरे सरकारकडून मला कुठलीही अपेक्षा नाही. हे सरकार गेलं तरच महाराष्ट्रातील लोकांचे जीव वाचतील असं राणे म्हणाले. 

अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्यानंतर राज्यात यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यावर बोलताना राणे म्हणाले की, अधिकारी ऐकत नसतील तर मुख्यमंत्री काय कामाचे? त्यांना कायदा माहीत नाही का? ते कारवाई का करत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. तसेच लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असतील तर लॉकडाऊनची अंमलबजावणी नीट होत नाही असा त्याचा अर्थ असल्याचेही राणे म्हणाले. तसेच संकटाच्या काळात राजकारण करू नये म्हणता, मग संकटाचं निवारण करा अशी विनंतीही नारायण राणे यांनी राज्य सरकारला केली आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser